Tuesday, December 16, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : भरधाव ट्रकच्या धडकेत पुलाची शिरोली येथे टेम्पो चालक ठार

Kolhapur : भरधाव ट्रकच्या धडकेत पुलाची शिरोली येथे टेम्पो चालक ठार

भरधाव ट्रकच्या धडकेत टेम्पो चालक ठार झाला. बापू आनंदा लोहार वय ६०, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर असे मृताचे नाव आहे. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील दारुल उलम मदरशासमोर सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. परवेज मकबूल मुल्ला वय ४०, रा. संभाजीनगर, नाळे कॉलनी , कोल्हापूर यांनी याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की परवेज मुल्ला व बापू लोहार हे आपले ताब्यातील टेम्पो घेऊन कराडच्या दिशेने निघाले होते. नागाव फाटा येथे त्यांच्या गाडीच्या पाठीमागील बाजूस फाळके पडल्याचा आवाज झाला. त्यामुळे त्यांनी महामार्गाच्या बाजूला टेम्पो उभा केला.

मुल्ला आणि लोहार हे दोघेजण गाडीतून उतरून गाडीच्या पाठीमागील बाजूस गेले. गाडीचे फाळके लावून ते पुन्हा टेम्पोत बसण्यासाठी पुढे निघाले. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने बापू लोहार यांना जोराची धडक दिली. या धडकेत बापू लोहार हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या शरीराचा कंबरेखालचा भाग ट्रकचे चाक गेल्याने निकामी झाला होता. उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

फिर्यादी मकबुल मुल्ला यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक सुशांत भगवान सावंत वय २५, टेंबलाई वाडी, पाटील गल्ली, कोल्हापूर याचे विरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पवार हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -