Friday, December 19, 2025
Homeसांगलीमिरज ; सुभाष नगर येथे एकाने घराबाहेर खिडकीला गळफास ,आत्महत्या नसून घातपात...

मिरज ; सुभाष नगर येथे एकाने घराबाहेर खिडकीला गळफास ,आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे



सुभाष नगर मालगाव हद्दीतील साई कॉलोनी पठाण पोल्ट्री समोर घराच्या बाहेर खिडकीला बाळू राजाराम शिंदे वय 65 यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आज सकाळी शेजाऱ्यांनी याची माहिती शिंदे यांच्या नातेवाईकांना दिली त्याच बरोबर यांची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना तालुका प्रमुख सुगंधा माने यांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्यांने संबंधित महिला छाया चव्हाण आणि तिचा मुलगा महेश चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

छाया चव्हाण या महिलेशी मयत बाळू शिंदे यांचे अनैतिक संबंध होते त्या महिलेचा आणि तिच्या मुलाचा बाळू शिंदे यांच्या कुटूंबाला त्रास होता पोलिसांत तक्रार ही देण्यात आली होती दोघांचा वारंवार त्रास होत असल्याने बाळू शिंदे यांचा मुलगा आणि सून घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते आज सकाळी बाळू शिंदे यांचा मृतदेह घराबाहेर खडकीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आला यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित महिला व मुलावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह खाली उतरून नये अशी भूमिका घेतली होती यावेळी पोलिसांनी नातेवाईक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची समजूत काढून रीतसर तक्रार घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनाला पाठविण्यात आला याबाबत मिरज ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -