Friday, July 25, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; पाडळी खुर्द येथे डोक्यात दगड घालून महिलेचा खून

कोल्हापूर ; पाडळी खुर्द येथे डोक्यात दगड घालून महिलेचा खून

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पाडळी खुर्द (तालुका करवीर) येथे येथे महिलेचा मृतदेह आढळला. डोक्याच्या मागे झालेल्या जखमेवरून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळावरील मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी राजवर्धन पाटील यांचे बिगा नावाच्या शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह दिसला. त्यावेळी सदर शेतकऱ्याने गावचे पोलीस पाटील सुरेश पाटील यांना फोन करून पोलीस पाटलांकडून करवीर पोलीस स्टेशनला वर्दी देण्यात आली. करवीर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी आल्यानंतर प्रथम दर्शनी त्या महिलेचे चप्पल, मृतदेहाच्या डोक्याच्या खाली आढळलेली भाजीव रक्ताने माखलेली अर्धी वीट, खांद्यावर लटकलेली पर्स या माध्यमातून महिलेचा खून झाला असल्याचे किंवा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.



मृतदेहाठिकाणी महिलेची सापडलेल्या पर्समध्ये आधार कार्ड व रस्त्यावर लावलेली गाडी MH 09-F 7764 यावरून आरती अनंत सामंत (वय 45) असे तिचे नाव आहे, असे सांगण्यात आले. घटनास्थळावरून मोबाईल द्वारे त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले. सदर महिला यांचे लग्न झाले असून त्या कोल्हापूर येथे शुक्रवार पेठेत भावाच्या घरी राहत असल्याची माहिती त्यांच्या भावाकडून पोलिसांना देण्यात आली. त्यांचे भाऊ शिर्डी येथे देव दर्शनाला गेले असल्यामुळे त्यांच्या पत्नी यांनी येऊन पाहिले असता आरती सामंत यांचाच मृतदेह असल्याची खात्री पटली.

सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर येथे दाखल करण्यात आला. प्रथमदर्शनी जरी खून झाला आहे असा अंदाज होत असला तरी शिवविच्छेदनानंतरच त्याचा निर्णय होईल. सदर घटनेची करवीर पोलीस स्टेशन येथे नोंद झाली असून पुढील तपास पोलीस उप अधीक्षक संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय सिंदकर,सूरज बनसोडे व टीम करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -