Friday, December 19, 2025
Homeराजकीय घडामोडीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अडचणींमध्ये वाढ, मशाल चिन्हावर 'या' पक्षाकडून दावा!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अडचणींमध्ये वाढ, मशाल चिन्हावर ‘या’ पक्षाकडून दावा!

राज्यातील राजकारणातून (Maharashtra political crisis) एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav balasaheb thackeray) या पक्षाला देण्यात आलेले मशाल (Mashal symbol) हे चिन्ह आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण आता मशाल या चिन्हावर समता पार्टीकडून (Samta party) आक्षेप घेण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांची मशाल आमच्या चिन्हा सारखीच दिसते असा दावा समता पार्टीकडून करण्यात आला आहे. यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कोर्टात तीन चिन्हांचे पर्याय सादर केले होते. यामधून निवडणूक आयोगाने त्यांना मशाल हे चिन्ह दिले. राज्यभरातील शिवसैनिक मशाल चिन्हांचे पोस्टर लावत आहेत. अनेक ठिकाणी मशाल यात्रा देखील शिवसैनिकांनी काढली. मात्र आता हेच चिन्ह वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण समता पार्टीचे चिन्ह देखील मशाल आहे. समता पार्टीने दावा केला आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाची आणि आमची मशाल ही सारखीच दिसते. मतदान यंत्रावर ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईटमध्ये पक्षाचे चिन्ह असते. त्यामुळे दोन्ही चिन्ह सारखीच दिसण्याची शक्यता आहे असे देखील समता पक्षाने म्हटले आहे.

एकनाथ शिंदेंच्या यांच्या घटाने निवडणूक आयोगासमोर सुरुवातीला शिंदे गटाने, त्रिशूळ, गदा आणि उगवता सूर्य हे पर्याय निवडणूक आयोगासमोर सादर केले होते. मात्र तिन्हीही चिन्हांना आयोगाकडून नाकारण्यात आले. यानंतर शिंदे गटाने सूर्य, ठाल-तलावर असे चिन्ह सादर केले होते. यामधून त्यांना ठाल-तलावर हे चिन्ह देण्यात आले. आता मशाल विरोधात ठाल-तलावर अशी लढाई रंगणार आहे.

एकनाथ शिंदेंच्या अभुतपूर्व बंडानंतर शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ यामुळे झाली. दोन गट पडल्यामुळे धनुष्यबाण चिन्हावर देखील दोन्ही गटांनी दावे केले. यामुळे हा वाद अखेर कोर्टात गेला. यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. आता दोन्हीही गटांना वेगवेगळी नावे आणि चिन्हे दिली आहेत. ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले आहे. तर ठाकरेंना मशाल आणि शिंदेंना ठाल-तलावर हे चिन्ह देण्यात आले आहे. मात्र आता मशाल या चिन्हावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -