बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) प्रेग्नंट आहे. लवकरच तिच्या घरी एक नवा पाहुणा येणार आहे. आलिया आणि रणबीरने एप्रिलमध्ये लग्न केले आणि जूनमध्ये त्यानी प्रेग्नेंसीची (Alia Bhatt Pregnancy) घोषणा केली होती. अशात आलिया भटला ती लग्नाआधीच प्रेग्नेंट होती असे म्हणत सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात होतं. आता या सर्वांवर आलियाची बहीण शाहीन भट्टने (Shaheen Bhatt) भाष्य केले आहे. आलियाच्या बचावासाठी शाहीन भट्ट पुढे आली आहे. आलिया लग्नापूर्वी प्रेग्नंट होती असे म्हणणाऱ्यांना शाहीनने चांगलेच सुनावले आहे.
काय म्हणाली आलियाची बहीण?
आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीविषयी शाहीन भट्टने नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केले. ती म्हणाली की, ‘सर्वांनाच खुश करणे शक्य नसते. पब्लिक फिगर असण्याचे काही दुष्परिणाम देखील असतात. आलियाचे स्वतःचे वेगळे आयुष्य आहे. हा तिचा प्रवास आहे. आलिया आणि रणबीर पब्लिक फिगर असल्याने त्यांच्याविषयी अनेकदा निगेटिव्ह देखील बोलले जाते. मात्र आपण कोणत्या गोष्टीं इग्नोर कराव्या हे आपण शिकायला हवे.’
बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक आहे शाहीन
तसेच पुढे बोलताना शाहीन म्हणाली की, ‘हे वर्ष आमच्या कुटुंबासाठी खूप छान राहिले आहे. आता आणखी आनंद येणार आहे आणि त्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’तसेच पुढे ती म्हणाली की, ‘आलियाच्या प्रेग्नेंसीविषयी कुटुंब नर्व्हस आणि उत्साहित आहे. तसेच आम्हा सिबलिंगमध्ये आलिया पहिली आहे, जी पॅरेंट्स होणार आहे. आम्ही बाळाची आतुरतेने वाट पाहत आहोत. आम्ही खूप उत्सुक आहोत.’
लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने दिली होती गोड बातमी
अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आलिया आणि रणबीर कपूर यांनी 14 एप्रिल 2022 रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर म्हणजेच जूनमध्ये या नवविवाहित जोडप्याने आई-वडील होणार असल्याची आनंदाची बातमी दिली. आलियाने इन्स्टाग्रामवर तिच्या गरोदरपणाची बातमी देणारी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये रणबीर तिच्या शेजारी बसला होता आणि ती हॉस्पिटलच्या बेडवर होती.
प्रेग्नेंसीमध्येही काम करतेय आलिया
आलिया भट्ट प्रेग्नेंसीमध्ये देखील खूप सक्रिय आहे. तिने काम थांबवलेले नाही. आलिया ब्रह्मास्त्र-1 मध्ये दिसली होती. 9 सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. याच्या प्रमोशनसाठी आलिया सतत विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसत होती. प्रेग्नेंसीचा तिच्या कामावर कोणताही परिणाम झालेला नाही. यानंतर आता आलिया भट्ट आपला हॉलिवूड चित्रपट हार्ट ऑफ स्टोनमध्ये दिसणार आहे. फिल्मचा प्रिमियर 2023 नेटफ्लिक्स येणार आहे. यासोबतच आलिया करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आजमी आणि रणवीर सिंह दिसणार आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होईल.