आज शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर दाखवल्यानंतर सेन्सेक्सने तब्बल 1000 अंकांपेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आज उत्साहाचं वातावरण आहे. भारतीय बाजाराप्रमाणे आशियाई शेअर बाजारातदेखील आज तेजी दिसून येत आहे.
मुंबई शेअर बाजारात (BSE) आज दु. 12.57 वाजता सेन्सेक्समध्ये 1,138 पेक्षा अधिक अंकांची वाढ होऊन सेन्सेक्स सध्या 58,373 अंकांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीमध्ये (Nifty) 268 अंकांची वाढ होऊन निफ्टी 17,282 अंकांवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्ये इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, लार्सन अँड टुब्रो आणि बजाज फायनान्स यांचे शेअर्स वधारले आहेत.
तर दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सावरत असून यापूर्वीच्या 82.35 रुपयांच्या तुलनेत आज (ता. 14 ऑक्टोबर) शुक्रवारी 8 पैशांनी वाढून 82.27 वर रुपया पोहोचला आहे. याशिवाय जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप 2.79 टक्क्यांनी वाढून सध्या क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप 944.24 अब्ज डॉलरवर आहे.
आज ‘या’ शेअर्सवर टाका नजर…
▪️ विप्रो (WIPRO)
▪️ अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
▪️ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
▪️ एसबीआय लाईफ (SBILIFE)
▪️ आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)
▪️ इंडियन हॉटेल्स (INDHOTELS)
▪️ पर्सिस्टंट (PERSISTENT)
▪️ भारत फोर्ज (BHARATFORGE)
▪️ ऍस्ट्रल (ASTRAL)
▪️ श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)