ताजी बातमी ऑनलाईन टीम
ऑस्ट्रेलियात तीन दिवसांनंतर म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत 23 ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे. या स्पर्धेपूर्वीच टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.
रवी शास्त्री आपल्या भविष्यवाणीत यावेळी कोणते खेळाडू भारतीय संघाला T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये घेऊन जातील, हे सांगितले आहे. भारताने 2007 मध्ये T20 विश्वचषकात विजेतेपद पटकावले होते. परंतु, तेव्हापासून टीम इंडियाने या स्पर्धेत विशेष कामगिरी केलेली नाही. मात्र, यावर्षी T20 विश्वचषकात टीम इंडियाला विजयाची संधी आहे.
जाणून घ्या काय म्हणाले रवी शास्त्री?
भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी T20 विश्वचषकापूर्वी भविष्यवाणी करत, यंदाच्या T20 विश्वचषकाच्या टीम इंडियाला उपांत्य फेरीत नेण्यात मोठे योगदान देणारे खेळाडू कोण असतील? हे सांगितले आहे. यात त्यांनी सूर्यकुमार यादव आणि अनुभवी फिनिशर दिनेश कार्तिकचे मधल्या फळीत पुनरागमन झाल्याने भारताची फलंदाजांची फळी चांगली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे स्पर्धेच्या बाहेर असला तरी फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघ उपांत्य फेरी गाठेल अशी भविष्यवाणी रवी शास्त्री यांनी केली आहे.
हे क्रिकेटपटू ठरतील महत्त्वाचे
रवी शास्त्री यांनी टीम इंडियाविषयी बोलताना, टी-20 क्रिकेटमध्ये भारताची चांगली लाइनअप आहे. चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, पाचव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या आणि सहाव्या क्रमांकावर ऋषभ पंत किंवा दिनेश कार्तिक आहे. यामुळे टॉप ऑर्डरला मोठा फायदा होत त्यांना जसे खेळायला हवे तसे खेळता येते. तसेच मधली फळी देखील मजबूत असल्याने फलंदाजीच्या जोरावर संघ उपांत्य फेरी गाठेल अशी भविष्यवाणी त्यांनी केली.रवी शास्त्री टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणावर देखील बोलले. ते म्हणाले क्षेत्ररक्षणादरम्यान वाचवलेल्या 15-20 धावांमुळे शेवटी मोठा फरक पडतो. त्यामुळे टीम इंडियाने क्षेत्ररक्षणावर लक्ष केंद्रित करत अधिक सुधार करावा असा सल्ला देखील त्यांनी दिला.