ताजी बातमी ऑनलाईन टीम
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बरेच चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज झाले आहेत. चित्रपटसृष्टीसाठी दिवाळी सण खूपच खास असतो. यावर्षी दिवाळीमध्ये फक्त एक किंवा दोन नाही तर तब्बल सात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हे चित्रपट कोणते ते पाहणार आहोत…
थँक गॉड –
बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगन आणि सिद्धार्थ मल्होत्राचा ‘थँक गॉड’ हा चित्रपट दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रिलीज होणार आहे. 25 ऑक्टोबरला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगन आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
राम सेतू –
अक्षय कुमारचा राम सेतु चित्रपट दिवाळीत रिलीज होणार आहे. 25 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत नुसरत भरुचा आणि जॅकलीन फर्नांडीस मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
हर हर महादेव –
‘हर हर महादेव’ हा चित्रपट 25 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये कमालीची उत्सुकता आहे.
प्रिन्स
साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा ‘प्रिन्स’ हा चित्रपट देखील दिवाशीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 21 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
गिन्ना –
‘गिन्ना’ हा चित्रपट दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात विष्णु मांचू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 21 ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.
उरी देवुदा –
उरी देवुदा हा तेलुगू चित्रपट देखील दिवाळीत रिलीज होणार आहे. 21 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विश्वक सेन आणि मिथिला पालकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.