बॉलिवूडची (Bollywood)मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या (Deepika padukone) सौंदर्याचे सर्वांनाच वेड लागले आहे. तिच्या सौंदर्याची केवळ देशातच नाही तर जगभरात चर्चा सुरु आहे. त्यामुळे तिचा जगातील टॉप 10 सुंदर महिलांच्या (10 most beautiful women) यादीत समावेश झाला आहे. दीपिका ही एकमेव भारतीय अभिनेत्री आहे जिने टॉप 10 सुंदर महिलांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. डॉक्टर ज्युलियन डी सिल्वा या शास्त्रज्ञाने ही यादी तयार केली आहे.
दीपिका पादुकोण नवव्या क्रमांकावर आहे
या यादीत जोडी कॉमरला जगातील सर्वात सुंदर महिला म्हटले आहे. जोडी कॉमर ही हॉलिवूड अभिनेत्री आहे. गायिका आणि अभिनेत्री जेंडाया दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकन मॉडेल बेला हदीद तिसर्या क्रमांकावर आहे. अमेरिकन गायिका, गीतकार आणि अभिनेत्री बियॉन्से चौथ्या क्रमांकावर, पाचव्या क्रमांकावर एरियाना ग्रांडे, सहाव्या क्रमांकावर टेलर स्विफ्ट आहे. अमेरिकन पॉप सिंगर जॉर्डन डन सातव्या क्रमांकावर आहे. किम कार्दशियनला आठवे आणि दीपिका पादुकोणला नववे स्थान मिळाले आहे. तर दक्षिण कोरियाची अभिनेत्री आणि मॉडेल होयोन जुंग हिला 10 वे स्थान मिळाले आहे.
कसे मोजले सौंदर्य
डॉक्टर ज्युलियन डी सिल्वा यांनी ही यादी काढली आहे. त्यांच्यानुसार सौंदर्य हे गोल्डेन रेश्योनुसार मोजले जाते. यामध्ये, चेहऱ्याचे सौंदर्य मोजले जाते आणि 1.618 (Phi) शी तुलना केली जाते. रिपोर्टनुसार, ‘गोल्डन रेशो ऑफ ब्युटी’, ज्याला Phi असेही म्हटले जाते, ही एक मॅथमॅटिकल मेथड आहे ज्यामध्ये फिजिकल परफएक्शनचे फॉर्मूले अप्लाय केले जातात. त्यांनी तयार केलेल्या यादीमध्येच दीपिका पादुकोणचाही समावेश आहे.
दीपिका पदुकोणचे आगामी चित्रपट
दीपिका पादुकोणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे सध्या एकापेक्षा एक चित्रपट आहेत. ‘पठाण’ या चित्रपटात ती बॉलिवूडचा किंग खान ‘शाहरुख खान’सोबत दिसणार आहे. ‘द इंटर्न’च्या हिंदी रिमेकमध्येही दीपिका दिसणार आहे. यासोबतच ती प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत या चित्रपटात दिसणार आहे. तसेच हृतिक रोशनसोबत ती ‘फाइटर’मध्ये देखील दिसेल.