ताजी बातमी ऑनलाईन टीम
भाजपच्या कार्यक्रमात मराठी कलाकारांचा अपमान केल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केला आहे. गायक राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून टायगर श्रॉफचा सत्कार केल्याचा व्हिडिओ अहिर यांनी ट्विटरवरून पोस्ट केला आहे. हाच का मराठी कलाकारांचा सन्मान?, असा सवाल अहिर यांनी उपस्थित केला आहे.
भाजपतर्फे (BJP) ‘मराठी सन्मानाच आपला मराठमोठा दीपोत्सव’ वरळीतल्या जांबोरी मैदानात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे आपलं गाणं सादर करतो होते. यावेळी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला. मंचावर भाजप आमदार मिहिर कोटेचा होते. राहुल देशपांडे यांच गाणं अर्ध्यावर आलं असतान त्यांना गाणं थांबवण्यास सांगण्यात आलं. गाणं मध्येच थांबवून टायगर श्रॉफचा सत्कार करण्यात आला.
सचिन अहिर यांचं टिविट
हाच का मराठी कलाकारांचा सन्मान….!!!!
भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे
मराठी कलाकारांची चेष्टा……..