Saturday, February 21, 2026
Homeकोल्हापूरहातभट्टीवाल्यांची दादागिरी वाढली, महिला पोलिसावर चाकूने हल्ला, कोल्हापुरातल्या घटनेने खळबळ

हातभट्टीवाल्यांची दादागिरी वाढली, महिला पोलिसावर चाकूने हल्ला, कोल्हापुरातल्या घटनेने खळबळ

ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही काळापासून अवैध धंदाच्या प्रमाणात वाढ झाल्याने पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. खून, मारामाऱ्या, चोऱ्या यासारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे.



याचबरोबर जुगार अड्डे, अवैध दारू गावठी भट्ट्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान यावर पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याच्या माणगाववाडी येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्हयातील माणगांववाडी ( ता. हातकणंगले ) येथे चोरून अवैध रित्या गावठी हातभट्टीची दारू बनवली जायची. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पथकासह गावठी हातभट्टी दारुअड्डयावर छापा टाकण्यासाठी गेले होते. यावेळी स्थानीक गुन्हे अन्वेषण पथकावर अवैधरित्या दारू उत्पादन करणाऱ्या 10 ते 15 अनोळखी इसमांनी पोलीसांवर हल्लाबोल केला.

यामध्ये काठी, दगड व चाकूचा सर्रास वापर करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि.26) रोजी घडली. यामध्ये एका महीला पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी महीला अधिकारी अंकीता पाटील असे त्यांचे नाव आहे. याबाबतची फिर्याद राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम अधिकारी शितल चंद्रकांत शिंदे यांनी हातकणंगले पोलिसांत दिली आहे.

दरम्यान गुरुवारी दुसऱ्या दिवशी स्थानीक गुन्हे अन्वेषणचे पथक व हातकणंगले स्थानिक पोलीसांनी माणगांववाडीमध्ये ठिय्या मांडून अनेक दारू अड्डे उध्वस्त केले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू काढण्यासाठी लागणारे रसायन, बॅरल व गूळ आदी मुद्देमाल जागीच नष्‍ट करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -