बॉलीवूडची प्रसिद्ध सुंदर अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या कामामुळे आणि फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. कियारा अडवाणी ही इंडस्ट्रीतील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या लूकचे आणि अभिनयाचे लाखो चाहते आहेत. या चाहत्यांसोबत ती सोशल मीड्याच्या माध्यमातून सतत कनेक्ट राहते. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक अतिशय बोल्ड आणि फॅशनेबल फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
कियारा सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. लाखो चाहते त्यांच्या नवीन फोटोजची आतुरतेने वाट पाहतात. अशात कियाराने पोस्ट केलेला फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. या फोटोत ती खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे.
कियाराने इन्स्टाग्रामवर स्वतःचे हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कियारा स्ट्रॅपलेस शीअर-लाँग ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे. खुले कर्ली केस आणि साध्या मेकअपसह तिने आपला लूक पूर्ण केला आहे. कियाराच्या या फोटोंना चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे. या फोटोत कियारा फॅशन आणि स्टाइलमध्येही सगळ्यांना मात देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना कियाराने कॅप्शनमध्ये चाहत्यांनाच कॅप्शन देण्याचे आवाहन केले आहे.
कियाराच्या या फोटोंवर कमेंट करून चाहते तिच्यावरील प्रेम व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर सध्या कियाराच्या या फोटोंची चर्चा आहे. या फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की ‘तू एखाद्या परीसारखी दिसत आहेस, तुला कोणाहीची दृष्ट लागू नये’, तर आणखी एका यूजरने लिहिले की ‘तुझ्याशिवाय जगण्यात काय आहे? ओ कियारा.
सध्या कियारा अडवाणी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चात होत आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांनी अद्याप त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. परंतु ते लग्न करणार असल्याच्या चर्चा देखील जोरात सुरू आहेत.