भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि आयपीएस अधिकारी संपत कुमार (IPS Sampath Kumar) यांच्यातील वाद आता चांगलाच चिघळला आहे. दरम्यान, धोनीने IPS संपत कुमार यांच्या विरोधात विरोधात मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या कारणावरून ही याचिका (Petition) दाखल करण्यात आली आहे. यात धोनीने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. हायकोर्टाने धोनीची मागणी मान्य केली असून या प्रकरणी मंगळावरपासून सुनावणी होणार आहे. दरम्यान, 2013 च्या आयपीएलमधील मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीशी (Match Fixing and Betting) संबंधित हे प्रकरण आहे.
2013 मध्ये आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीचं (Match Fixing and Betting) प्रकरण समोर आले होत. हे प्रकरण IPS संपत कुमार हाताळत होते. या प्रकरणात त्यांनी महेंद्रसिंग धोनीवरही (MS Dhoni) काही आरोप केले होते. आयपीएस अधिकारी संपत कुमार (IPS Sampath Kumar) यांनी माझ्यावर स्पॉट फिक्सिंगचा आरोप करून माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे माझ्याविरोधात खोट्या बातम्या येत असल्याचे म्हणत धोनीने ही याचिका (Dhonis Petition Against IPS) दाखल केली आहे. या याचिकेत धोनीने कोर्टाकडे 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा देखील केला आहे.
न्यायालयाने मनाई केली असताना केले वक्तव्य
या प्रकरणात सुनावणी दरम्यान, 2014 मध्ये न्यायालयाने IPS संपत कुमार यांना धोनीविरोधात (Mahendra Singh Dhoni) चुकीचे आणि वादग्रस्त वक्तव्य करू नये अशी समाज दिली होती. मात्र, असे असतानाही IPS कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत अपमानास्पद टिप्पणी केली. न्यायालयीन व्यवस्थेबद्दल आणि धोनीविरुद्धच्या खटल्यांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणारे आघाडीचे वकील यांच्या विरोधात ही अपमानास्पद टिप्पणी होती. त्यामुळे आता धोनीने या प्रकरणी न्यायालयात धाव घेत IPS कुमार यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. न्यायालायने धोनीची याचिका मान्य केली असून या प्रकरणी मंगळवारपासून संपूर्ण सुनावणी होणार आहे.