Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंगसंजय राऊतांचा जामीन अर्ज अखेर मंजूर, तुरुंगातून येणार बाहेर!

संजय राऊतांचा जामीन अर्ज अखेर मंजूर, तुरुंगातून येणार बाहेर!

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांना कोर्टाने अखेर दिलासा दिला आहे. आजच्या जामीन अर्जाच्या सुनावणीमध्ये राऊतांना अखेर जामीन मंजूर करण्यात आलाय. गेल्या काही महिन्यांपासून संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणामध्ये तुरुंगात होते. जामीन मिळावा यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून ते प्रयत्न करत होते. मात्र त्यांना जामीन मिळत नव्हता. यामुळे राऊतांची दिवाळी आणि दसरा देखील तुरुंगातच गेले होते. आज अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत हेच मास्टरमाईंड असल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे.

कधीपासून अटकेत होते राऊत?
संजय राऊत हे जुलै महिन्यापासून अटकेत होते. 31 जुलै रोजी अटक करण्यात आलेली होती. यांना कथित पत्राचाळ घोटाळ्याचा आरोप करत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतरपासून राऊत हे जामीन मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना जामीन मंजूर होत नव्हता. जुलै महिन्यापासून राऊत हे आर्थर रोड तुरुंगात होते. ईडीकडून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांचा थेट हात आहे असा ठपका ईडीने ठेवला आहे. मात्र राऊतांनी हे आरोप फेटाळले आहे. या घोटाळ्याशी काहीच संबंध नसल्याचा युक्तीवाद राऊतांच्या वकिलांकडून केला जात आहे.

पत्राचाळ प्रकरण नेमके काय?
संजय राऊत यांचे भाऊ प्रविण राऊत हे पत्राचाळ डेव्हलेपमेंटकडे लक्ष देत होते. याच काळात त्यांना एचडीआयएल ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले होते. यामधील 1 कोटी 6 लाख रुपये हे राऊतांच्या पत्नींच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. या पैशांमधून राऊत यांनी अलिबागेत जमीन खरेदी केली असा आरोप आहे. पत्राचाळ प्रकरणात घोटाळा केल्यामुळे राऊत कुटुंबियांना मोठा फायदा झाला असे ईडीचे म्हणणे आहे. यासोबतच या पत्राचाळ डेव्हलपमेंटमध्ये प्रविण राऊत फक्त नाममात्र होते. मात्र या मागचे मास्टरमाईंड संजय राऊत होते असा आरोप देखील ईडीने केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -