टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा (team india) सामना इंग्लंड (England) संघाशी होणार आहे. हा सामना 10 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या (Australia) अॅडलेड ओव्हलवर होणार आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया चौथ्यांदा इंग्लंडशी भिडणार आहे. भारतीय संघाने T20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला दोनदा पराभूत केले आहे. इंग्लंडचा संघ एक सामना जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. त्याच वेळी, दोन्ही संघ टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 22 वेळा भिडले आहेत. भारतीय संघ 12 वेळा विजय मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघाने भारताविरुद्ध 10 वेळा विजय मिळवला आहे.
कधी आहे सामना?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सेमीफायनल गुरुवारी म्हणजेच 10 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड ओव्हल येथे हा सामना होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता हा सामना खेळवला जाईल. मॅस सुरु होण्याच्या अर्धा तास अगोदर 1 वाजता टॉस होईल.
कुठे पाहू शकता सामना
टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारत आणि इंग्लंडमधील दुसरा सेमीफायनलचा लाइव्ह टेलिकास्ट तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर पाहू शकता. यासोबतच सामन्याची लाइव्ह स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर पाहता येईल.
असे आहेत दोन्हीही संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
इंग्लंड संघ : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड .