Sunday, August 3, 2025
Homeसांगलीनांद्रेत पाच एकर ऊस जळून खाक, बळीराजाचे लाखांचे नुकसान

नांद्रेत पाच एकर ऊस जळून खाक, बळीराजाचे लाखांचे नुकसान

नांद्रे येथील विद्युत वाहक तारांमुळे स्पार्क होऊन पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे.गावातील तरूणांच्या सतर्कतेमुळे अनेक एकर ऊस वाचवण्यात यश आले. गावात मुख्य पीक ऊस असल्याने हाजारो हेक्टर ऊस शेती आहे. शेतातून जाणाऱ्या विद्युततारांच्या मुळे शॉर्टसकिट होऊन पत्रकार महेबूब मुल्ला यांच्या शेतात स्पार्क होऊन मुल्ला व भिलवडे यांचे मिळून पाच एकर ऊस जळून खाक झाला. मुल्ला यांच्या शेतातील शेड जवळ ऊस पेटल्याचे वृत्त गावात कळताच शेकडो तरुणांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवले. यामुळे इतर पिकांचे नुकसान टळले.

या घटनेची माहिती मिळताच तलाठी स्वप्निल शिंदे, कर्मचारी भरत पाटील यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला. नांद्रेत पाच एकर ऊस जळल्याची घटना श्री.दत्त इंडियाचे कार्यकारी संचालक मुत्युजंय शिंदे यांना संपर्क करून मुल्ला यांनी दिली असता त्यांनी तात्काळ दखल घेतली. मुख्य शेती अधिकारी मोहन पवार,सांगली सेंन्टर प्रमुख गणेश तावदर,फिल्डमन अभिजीत भोसले,शेती मदतनिस पटेल, विकी पाटील यांनी पाहणी करून तात्काळ जळीत ऊस तोडून गाळपास कारखान्याकडे पाठिवल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -