Saturday, August 9, 2025
Homeब्रेकिंगराजीव गांधींच्या 6 मारेकऱ्यांची सुटका होणार, सुप्रीम कोर्टाने दिले सुटकेचे आदेश!

राजीव गांधींच्या 6 मारेकऱ्यांची सुटका होणार, सुप्रीम कोर्टाने दिले सुटकेचे आदेश!

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील (Rajiv Gandhi Assassination Case) 6 दोषींची तात्काळ सुटका करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. राजीव गांधींच्या हत्या प्रकरणातील दोषींमध्ये नलिनी, रविचंद्रन, मुरुगन, संथन, जयकुमार आणि रॉबर्ट पॉयस यांचा समावेश आहे. या सर्वांची सुटका करण्याचे आदेश आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले आहेत. 30 वर्षांपेक्षा अधिक काळ झाले हे सर्व दोषी जेलमध्ये आहेत. याच आधारावर त्यांची सुटका करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

17 मे रोजी सुप्रीम कोर्टाने राजीव गांधी हत्या प्रकरणातील आणखी एक दोषी पेरारिवलनला सोडण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणातील उर्वरित दोषींनीही याच आदेशाचा हवाला देत कोर्टाकडून सुटकेची मागणी केली होती. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आर एस गवई आणि न्यायमूर्ती बीव्ही नागरत्न यांच्या खंडपीठाने राजीव गांधी हत्या प्रकरणात नलिनी, रविचंद्रन, मुरुगन, संथन, जयकुमार, आणि रॉबर्ट पॉयस यांची सुटका करण्याचे आदेश दिले.

न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती नागरथना यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान सांगितले की, ‘तामिळनाडू सरकारने या दोषींच्या सुटकेसाठी राज्यपालांकडे शिफारस पाठवली होती पण राज्यपालांनी त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पेरारिवलन प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राज्यपालांना राज्य सरकारची शिफारस मान्य करण्यास बांधील असल्याचे सांगितले. दोषींच्या सुटकेबाबत निर्णय घेण्यास राज्यपालांकडून अवास्तव विलंब झाला. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने कलम 142 अन्वये देण्यात आलेल्या विशेष अधिकारांचा वापर करून पेरारिवलन यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. पेरारिवलन प्रकरणात दिलेला आदेश या दोषींनाही लागू असल्याचे कोर्टाने सांगत इतर दोषींनाही तातडीने सोडण्यात यावे असे आदेश दिले.

राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व दोषींनी 30 वर्षांपासून शिक्षा भोगत आहे. याबदद्ल कोर्टाने सांगितले की, ‘दोषींनी 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवला आहे आणि तुरुंगात त्यांची वागणूक चांगली राहिली आहे. रॉबर्ट पॉईस याने अनेक रोगांशी लढा देत पदवी मिळवली. जयकुमार याने तुरुंगातही आपले शिक्षण पूर्ण केले. संथनने अनेक रोगांशी लढणारे लेख लिहिले त्यासाठी त्याला बक्षीसही मिळाले. नलिनी, रविचंद्रन, मुरुगन यांनीही तुरुंगात चांगली वागणूक दिली. तीस वर्षांहून अधिक काळ तुरुंगात राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -