ताजी बातमी ऑनलाईन टीम
मनोरंजन विश्वातून आणखी एक गोड बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूने शनिवारी आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. बिपाशा बसू आणि करण सिंग यांच्या घरी एका गोड मुलीचे आगमण झाले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आलिया भट्ट आणि देबिना चक्रवर्ती यांनी गुड न्यूज दिली होती, त्यानंतर आता बिपाशा बसू देखील आई बनली आहे. बिपाशा वयाच्या 46 व्या वर्षी आई झाली आहे.
बिपाशा आणि करण या जोडप्याने अद्याप ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांना गोड मुलगी झाली आहे. या जोडीच्या टीमनेही चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. या स्टार कपलच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार करण आणि बिपाशाने लग्नाच्या सहा वर्षानंतर त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आहे. त्यांच्या आयुष्यात मुलीच्या आगमनानंतर दोघेही खूप आनंदी आहेत. बिपाशा आणि करण यांनी 30 एप्रिल 2016 रोजी लग्न केले होते. त्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये बिपाशाने तिच्या तिच्या प्रेग्नंसीची माहिती दिली होती.
आता बिपाशा आणि करण आई-बाबा बनल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीनंतर सोशल मीडियावर या जोडप्याच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. करण आणि बिपाशाच्या चाहत्यांपासून ते अनेक मोठ्या स्टार्सपर्यंत सगळेच या जोडप्याला खूप शुभेच्छा देत आहेत.



