ठाणे, 13 नोव्हेंबर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर इन्कमिंग सुरूच आहे. आता पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार आहे
शिवसेनेचे भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफ़ान सय्यद यांच्यासह 1000 हजार कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहे. एकापाठोपाठ ठाकरे गटातील ज्येष्ठ नेत्यांपासून ते कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत आहे. आता पिंपरी चिंचवडमध्येही शिंदे गटाने मोठा गट फोडला आहे. शिवसेनेचे भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफान सय्यद हजारो कार्यकर्तेसह शिंदे गटात प्रवेश करणार आहे.
उद्या सोमवारी आनंद दिघे यांच्या ठाणे येथील टेंभी नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. या प्रवेश सोहळ्यानंतर इरफान सय्यद यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. इरफान सय्यद हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे मोठे कामगार नेते आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
सुषमा अंधारे यांचे पतीही शिंदे गटात! दरम्यान, ठाकरे गटातील प्रवक्त्या सुषमा अंधारे अनेकदा शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका करताना दिसतात. मात्र, आता एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. सुषमा अंधारे यांचे पतीच आता बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज दुपारी सुषमा अंधारे यांचे पती शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. टेंभी नाका येथील आनंद मठात हा प्रवेश होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला हा पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. अंधारे कुटुंबीयात फूट पडली आहे. शिवसेनेची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारेंचे पती एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करत आहेत.