मिरज तालुक्यातील बेडग येथे लम्पी आजाराचे थैमान वाढले आहे. अनेक जनावरे बाधीत असून जनावरांच्या मृत संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. शासकीय लसी व उपचाराअभावी संसर्गात वाढ होत असून बेडगच्या राज्यक्षेत्रीय पशू वैद्यकिय दवाखाना श्रेणी -२ मधील पशूधन पर्यवेक्षक यांच्या हलगर्जीपणा मुळे लम्पी बाधीत जनावरांचा मृत्यू होत असून उपचारांची नोंदी नाही अशी तीव्र नाराजी पशू पालकांच्यातून होत आहे.
तसेच होणाऱ्या नुकसानाची भरपाई शासनाने त्वरित पंचनामा करून पशुपाल्यांना देण्यात यावी आणि जास्तीत जास्त लसीचा पुरवठा व्हावा.लवकरात लवकर पशु वैद्य डॉक्टरांची नेमणूक करावी यांच्यावर अंमलबजावणी न झाल्यास एम.आय.एम तर्फे धरणे आंदोलन करण्याचा एम.आय.एम तालुका अध्यक्ष राकेश कांबळे यांनी इशारा दिला आहे.