Monday, August 4, 2025
Homeसांगलीमहापालिकेच्या खुल्या भूखंडाबाबत महापौर सोबत सर्वपक्षीय पदाधिकारी आक्रमक;सिटी सर्वे कार्यालयात तक्रार

महापालिकेच्या खुल्या भूखंडाबाबत महापौर सोबत सर्वपक्षीय पदाधिकारी आक्रमक;सिटी सर्वे कार्यालयात तक्रार

महापालिकेच्या मालकीची हजाराहून खुली भुखंडे आहेत. पण या भूखंडाला अद्याप महानगरपालिकेचे नाव लागलेले नाही. मूळ मालकाचे नाव कायम असल्याने कालांतराने या भूखंडाचा बाजार होत आहे. मंजूर रेखांकनातील अनेक खुल्या भूखंडाची परस्पर विक्री केली जात आहे. भूखंडाचा बाजार रोखण्यासाठी महापालिकेने उपजिल्हाधिकारी दर्जाच्या निवृत्ती अधिकाऱ्याची नियुक्ती ही केली आहे. त्यांच्यामार्फत खुल्या भूखंडाला नाव लावण्याचे काम सुरू आहे. पण त्याच्यासाठी सिटी सर्वे कार्यालयाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

अनेक भूखंडाच्या सातबारावर महापालिकेचे नाव आहे पण पण सुट्टी सर्वच्या दप्तरी अजूनही मूळ मालकाचे नाव लागलेले आहे. अशी अनेक प्रकरणे काही दिवसात समोर आली. याबाबत महापौर यांच्याकडेही तक्रार आल्या. महापौर दिग्विजय सूर्यवंशी भाजप गटनेत्या भारती दिगडे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान,ॲड.अजित सुर्यवंशी, अमर निंबाळकर यांच्याकडे धाव घेतली. कॉलेजचे नाव लावण्यास विलंब होत असल्याने जाब विचारला. सिटी सर्वे कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार ही नगर भूमापन अधिकारी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -