Monday, February 23, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर आज महानाट्य? शेकडो कार्यकर्त्यांसह मविआ नेते बेळगावात जाणार..

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर आज महानाट्य? शेकडो कार्यकर्त्यांसह मविआ नेते बेळगावात जाणार..

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नात आज महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. त्याचवेळी महाराष्ट्र एकिकरण समितीचं महाअधिवेशनदेखील बेळगावात आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनाला शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने जाणार होते. मात्र त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आलाय. पण महाविकास आघाडीने आक्रमकता दाखवत बेळगावात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मविआचे तीन महत्त्वाचे नेते हजारो कार्यकर्त्यांसह बेळगावात जाणार आहेत.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात येण्यास कर्नाटक सरकारने मनाई केली आहे. त्यातच आता बेळगावात मविआचे नेते आणि कार्यकर्ते जाणार असल्याने कर्नाटक सीमेवर मोठा राडा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र एकिकरण समितीच्या महामेळाव्याला मविआचे हसन मुश्रीफ, संजय पवार आणि विजय देवणे हे तीन नेते उपस्थिती दर्शवणार आहेत. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्तेही बेळगावात जाणार आहेत.

त्यामुळे सीमावर्ती भागात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कागलमध्ये मविआचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र जमणार आहेत. कोगनोळी मार्गे ते बेळगावात जाण्याचा प्रयत्न करणार आहेत.

महाराष्ट्रातील नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत कर्नाटकच्या शेकडो पोलिसांचा ताफा तैनात आहे. तर सीमेवर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्र पोलीसदेखील सज्ज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -