Sunday, July 27, 2025
Homeक्रीडाघटस्फोटाची चर्चा सुरु असतानाच सानिया मिर्झाचा मोठा निर्णय...

घटस्फोटाची चर्चा सुरु असतानाच सानिया मिर्झाचा मोठा निर्णय…

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान आता महत्त्वाची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होती. यानंतर आता सानिया मिर्झाने वेगळीच घोषणा केली. सानिया मिर्झाने टेनिमधून निवृत्ती घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सानिया मिर्झाने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये ती शेवटची खेळताना दिसणार आहे.


गेल्या 20 वर्षांपासून अनेकांसाठी आदर्श असलेली सानिया मिर्झाने आपली व्यावसायिक कारकीर्द संपवण्याची घोषणा केली आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या WTA 1000 स्पर्धेतील दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये सानिया आपला शेवटचा सामना खेळणार आहे. सानियाची कारकीर्द चांगली होती. पण सहा महिन्यांपूर्वी झालेल्या दुखापतीमुळे ती कोर्टाबाहेर होती आणि आता तिने कारकीर्द पुढे न नेण्याचा विचार करत निवृत्तीची घोषणा केली आहे. सानिया मिर्झाने 2003 मध्ये प्रो-टेनिस खेळण्यास सुरुवात केली होती.


RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -