Wednesday, July 30, 2025
Homeकोल्हापूरयुवराज मालोजीराजे छत्रपतींनी द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो याची केली घाेषणा; जाणून...

युवराज मालोजीराजे छत्रपतींनी द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो याची केली घाेषणा; जाणून घ्या वेळापत्रक

कोल्हापुरातील पोलो ग्राउंडवर उद्यापासून (ता. दहा मार्च) द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो याचे आयाेजन करण्यात आले आहे.तीन दिवस चालणा-या या द राॅयल हाॅर्स शाेमध्ये सुमारे 250 घाेडेस्वार सहभागी हाेणार असल्याची माहिती कोल्हापूर इक्वेस्ट्रियन असोसिएशनचे अध्यश्र युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी दिली.

युवराज मालोजीराजे छत्रपती म्हणाले कोल्हापुरात 10, 11 आणि 12 मार्चला द रॉयल हॉर्स शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कोल्हापुरातील पोलो ग्राउंडवर होणाऱ्या द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो साठी पुणे, ठाणे, सातारा, अकलूज, कोल्हापूर,पन्हाळा आणि अतिग्रे अशा विविध ठिकाणाहून घोडेस्वार दाखल होत आहेत.

या स्पर्धेसाठी 20 थरोब्रेड, 40 काठेवाड , 20 मारवाडी असे एकूण 80 घोडे तर 250 घोडेस्वार भाग घेत आहेत. चीफ पेट्रॉन शाहू छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत आहे. काेल्हापूरातील ही स्पर्धा म्हणजे अश्वप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे असेही युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -