Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरआजपासून तीन दिवस वादळी पावसाचा इशारा!

आजपासून तीन दिवस वादळी पावसाचा इशारा!

कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात बुधवार, दि. 15 पासून दि. 17 पर्यंत वादळी पावसाची शक्यता आहे. शनिवार, दि. 18 रोजीही पावसाचा हलक्या सरी बरसतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यानुसार जिल्हा प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्मा वाढत आहे. वातावरण ढगाळ होत आहे. यामुळे अवकाळी पावसाची शक्यता आहे. उद्यापासून तीन दिवस जोरदार वारे आणि विजेच्या कडकडाटासह दुपारनंतर पाऊस होईल, असा अंदाज आहे. आजही उकाडा होता. दुपारी उन्हाची तीव-ता अधिक जाणवत होती. कोल्हापुरात आज कमाल 35.5 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. दुपारनंतर काही काळ वातावरण ढगाळ झाले होते. सायंकाळनंतरही हवेत उष्मा जाणवत होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -