इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघ आपला पहिला सामना जिंकून मैदानात उतरले आहेत.अशा परिस्थितीत चाहत्यांना धमाकेदार सामन्याची अपेक्षा आहे.
इंडियन प्रीमियर लीगचा हा सामना एक खास सामना असणार आहे. आयपीएलचा पहिला चॅम्पियन असलेल्या राजस्थान रॉयल्सकडे यावेळी दोन होम ग्राउंड्स आहेत. जयपूर व्यतिरिक्त राजस्थान रॉयल्सचा संघ अशा शहरात खेळेल जिथे आतापर्यंत एकही आयपीएल सामना खेळला गेला नाही. आज हा सामना नवीन शहरात खेळल्या जाणार आहे.
राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील हा सामना गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलमधली ही पहिलीच वेळ असेल जेव्हा हा सामना बारसापारा स्टेडियमवर खेळला जाईल. गुवाहाटी हे राजस्थान रॉयल्सचे दुसरे होम ग्राउंड आहे.
आयपीएल 2023 दरम्यान राजस्थान रॉयल्स येथे एकूण दोन सामने खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ गुवाहाटी येथे पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना करेल तर दुसऱ्या सामन्यात त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल.
राजस्थान रॉयल्स संघ – संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, आर अश्विन, युझवेंद्र चहल, केसी करिअप्पा, ओबेद मॅककॉय, नवदीप सैनी, के.सी. सेन, कुलदीप यादव, जेसन होल्डर, डोनोवन फरेरा, कुणाल राठौर, अॅडम झाम्पा, केएम आसिफ, मुरुगन अश्विन, आकाश वशिष्ठ, अब्दुल पीए, जो रूट.
पंजाब किंग्ज संघ- शिखर धवन, शाहरुख खान, मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज बावा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, नॅथन एलिस, बलतेज सिंग, कागिसो रबाडा, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, सॅम कुरान, सिकंदर रझा, हरप्रीत भाटिया, विद्वथ कवेरप्पा, शिवम सिंग आणि मोहित राठी.
BCCI ने घेतला मोठा निर्णय! इतिहासात पहिल्यांदाच या शहरात होणार IPLचा सामना
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -