Wednesday, August 6, 2025
Homeसांगलीजुन्या भांडणाच्या रागातून दहशत माजवत जबरी चोरी : दोघांना अटक

जुन्या भांडणाच्या रागातून दहशत माजवत जबरी चोरी : दोघांना अटक

जुन्या भांडणाचा राग मनात धरून जुना बुधगाव रोडवरील वाल्मिकी आवास मध्ये असणाऱ्या कॅरम क्लबमध्ये घुसून दोघांनी चाकू, कुन्हाड आणि कोयत्याने दहशत माजवत जबरी चोरी केल्याची घटना घडली. सदरची घटना ही गुरुवार ता. ६ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सोहेल जावेद शेख (वय २५ रा. वाल्मिकी आवास) याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ऋषिकेश दिनकर गवळे (वय २४) आणि सिध्दराज दिनकर गवळे (वय २९ दोघे रा. वाल्मिकी आवास) या दोघांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.
सोहेल शेख हा जुना बुधगाव रोडवरील वाल्मिकी आवास मध्ये राहतो. गुरुवार दि. ६ एप्रिल रोजी दुपारी वाल्मिकी आवास येथे असणाऱ्या कॅरम क्लब मध्ये दोघे संशयित आले. त्यांनी शेख याचा भाऊ अरबाज माजगावकर आणि त्यांच्यात झालेल्या जुन्या भांडणाच्या रागातून मोटारसायकलवरून येत अरबाज कुठे आहे त्याला आज ठेवतच नाही असे म्हणत शिवीगाळी करून कोयता, चाकू आणि कुन्हाडने दहशत माजवत क्लब मधील दिवे फोडून १ हजार ७०० रुपये जबर दस्तीने चोरून नेले. अरबाज याच्या घरात घुसून त्याच्या आईला शिवीगाळी करून घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले. सोहेल शेख आणि अरबाजला ठेवत नाही अशी धमकी दिली. या प्रकारानंतर सोहेल शेख याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -