जिल्ह्यात दिवसागणिक गल्लोगल्ली भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांची दहशत वाढत चालली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या एका अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार कोल्हापुरात गेल्या सहा महिन्यांत तब्बल 34 हजार 89 नागरिकांचा कु त्र्यांनी चावा घेतला आहे. राज्यात सर्वाधिक श्वान दंशाचे प्रमाण मुंबई, ठाणे असून त्यानंतर कोल्हापूरचा क्रमांक लागतो.
कोल्हापुरातील भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातल्याच्या अनेक घटना आहेत. तर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदनाच्या खोलीशेजारी असलेल्या एका शेडमध्ये भटक्या कुत्र्यांनी मृत अर्भकाचे लचके तोडल्याची घटना ताजी आहे. या भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली असून यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वतीने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे गरजेचे आहे.
1 जानेवारी 2023 ते 30 जून 2023 दरम्यान राज्यात 3 लाख 89 हजार 110 नागरिकांना श्वान दंश झाल्याची नोंद आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबई असून येथे 41 हजार 828 श्वान दंशाची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यानंतर ठाण्याचा नंबर लागतो येथे 36 हजार 60. कोल्हापूरमध्ये 34 हजार 89 तर अहमदनगरमध्ये 33 हजार 392 जणांना श्वान दंश झाल्याची नोंद आहे.रेबीजची लक्षणे
रेबीज हा प्राण्यांनी चावल्यामुळे पसरणारा एक व्हायरस आहे. रेबीजचा व्हायरस रुग्णाच्या शरीरात शिरल्यानंतर मज्जासंस्थेवर हल्ला करतो. यामुळे रुग्णाच्या डोक्यात आणि मणक्यात सूज येते. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रेबीज होण्याचा धोका असतो. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर अॅन्टी रेबीज व्हॅक्सिन न घेतल्यास रेबीजची लक्षणे 2 ते 12 आठवड्यांमध्ये दिसू लागतात. रेबीजचे संक्रमण झाल्यानंतर रुग्णाच्या स्वभावामध्ये आक्रमकता येते. त्यानंतर स्नायू दुखण्यास सुरुवात होते. ताप, हृदयाच्या ठोक्यांमध्ये वाढ होते आणि यानंतर पाण्यापासून त्याला भीती वाटण्यास सुरुवात होते.
सीपीआरमध्ये दरमहा 100 ते 150 रुग्ण
सीपीआर रुग्णालयाची ओपीडी बंद झाल्यानंतर अपघात विभागामध्ये आपत्कालीन स्थितीत महिन्याला 100 ते 150 रुग्ण हे श्वान दंशाचे येत आहेत. यावरून जिल्ह्यातील श्वान दंशाचा धोका लक्षात येतो. रेबीज झाल्यानंतर 100 टक्के रुग्णाचा मृत्यू होतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. यामुळे काळजी घेणे गरजेचेच आहे.भटकी कुत्री निर्बिजीकरण व लसीकरण 2001 या कायद्यामुळे भटक्या कुत्र्यांना मारता येत नाही. तसेच त्यांना बाहेर सोडता येत नाही. शहरात साडेपाच हजारांवर कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे.
– डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक, महानगरपालिका
कुठलाही वन्याप्राणी चावल्यानंतर 48 तासांच्या आत अॅन्टी रेबीज व्हॅक्सिन घेणे गरजेचे असते. कुत्रे मध्यम चावले असेल तर इंजेक्शनचे चार डोस, तीव- चावले असेल तर जखमेत इम्युनोग्लोबिलीनचे इंजेक्शन देणे गरजेचे असते. तसेच कुत्रे चावल्यानंतर जखमेवर चुना, माती न लावता जखम स्वच्छ पाण्याने धुवावी.
कोल्हापूर : सात महिन्यांत 34 हजार लोकांचा कुत्र्यांनी घेतला चावा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -