Friday, August 1, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एकास अटक

इचलकरंजीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एकास अटक

इचलकरंजीत अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन लगिक अत्याचार करत बलात्कार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक निवास चव्हाण (वय ४०, रा. कोरोची) असे संशयिताचे नांव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. दरम्यान, अटक केलेल्या संशयित आरोपीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्याला १४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संशयित विनायक चव्हाण याने पिडीत मुलीला कॉलेजला सोडण्यासाठी म्हणून मोटरसायकलवर घेतले. परंतु तिला कॉलेजला न सोडता तिला कोल्हापूर रोडवरील नंदनवन या लॉजवर नेले. त्याठिकाणी तिच्याशी लगट करत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. आणि हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुझे काही खरे नाही अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -