Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनकियारा अडवाणी आणि क्रिती सनॉन यांना मोठा धक्का! ‘डॉन 3’साठी या अभिनेत्रीचे...

कियारा अडवाणी आणि क्रिती सनॉन यांना मोठा धक्का! ‘डॉन 3’साठी या अभिनेत्रीचे नाव जोरदार चर्चेत

डॉन 3 हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. डॉन 3 मध्ये रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेत असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, निर्माते अजूनही अभिनेत्रीच्या शोधात आहेत.

कियारा अडवाणी आणि क्रिती सनॉन यांच्या नावाची जोरदार चर्चा डॉन 3 चित्रपटासाठी रंगताना दिसत आहे. मात्र, रणवीर सिंह याच्यासोबत त्यांना तगडी अभिनेत्री हवी आहे.आता कियारा अडवाणी आणि क्रिती सनॉन यांच्या नावानंतर दीपिका पादुकोण हिचे नाव चर्चेत आले आहे. रिपोर्टनुसार डॉन 3 च्या निर्मात्यांनी या चित्रपटासाठी दीपिका पादुकोण हिच्यासोबत संपर्क साधलाय.

विशेष म्हणजे रणवीर सिंह याच्यासोबत धमाकेदार अभिनय दीपिका पादुकोण करू शकते असे निर्मात्यांना वाटत आहे. मात्र, याबद्दल अजून दीपिका किंवा निर्मात्यांकडून खुलासा करण्यात नाही आला.

डॉन 3 चित्रपटात रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे दिसू शकतात, हे ऐकल्यापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह हा बघायला मिळत आहे. डॉन 3 वर सर्वांच्याच नजरा दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -