हिंदू कॅलेंडरनुसार १७ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. या श्रावणात चार सोमवार आले आहे. पहिला श्रावण महिना हा आज असून दुसरा २८ ऑगस्ट, तिसरा ४ आणि ११ सप्टेंबर या दिवशी असणार आहे.
धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात भगवान शंकराची मनोभावे पुजा केल्यास अनेक समस्या दूर होतात. भगवान शंकराला श्रावण महिना अतिशय प्रिय असतो. तसेच श्रावण सोमवारला अधिक महत्व आहे.
हा श्रावण महिना एक महिना चालणार आहे. यामुळे श्रावणात चार सोमवार आले आहेत. श्रावण महिना हा भगवान शंकराच्या पुजेसाठी सर्वोत्तम महिनी मानला जातो. कारण असे मानले जाते की श्रावण महिन्यात भगवान शिव प्रसन्न होतात आणु तुमच्या सर्व मनोकामना पुरण होतात.
श्रावणात महादेवाची रोज सकाळी पुजा केली जाते. पण श्रावणातील सोमवारला खुप खास महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार सोमवार हा भगवान शंकराला समर्पित दिवस आहे.यासाठी श्रावण सोमवार महत्वाचा आहे.
धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात माता पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी मनोभावे कठोर तपश्चर्या केली. माता पार्वतीच्या मनोभावे केलेल्या कठोर तपश्चर्यने प्रसन्न होऊन भगवान शंकराने माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले.
अशा प्रकारे माता पार्वतीचा भगवान शंकराशी विवाह झाला. यामुळे श्रावण महिना माता पार्वती आणि भगवान शंकराचा आवडता महिना आहे. यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवार खुप महत्वाचा आहे.
यामुळे श्रावण सोमवार विवाहित महिला आणि अविवाहित मुलींसाठी खुप खास आहे. श्रावण सोमवारी विवाहित महिला दिवसभर उपवास करतात आणि भगवान शंकराची पुजा करतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करतात तर अविविहित मुली श्रावण सोमवारी भगवान शंकराची पुजा करतात.
धार्मिक मान्यतेनुसार महादेवाची पुजा करतांना ओम नम: शिवाय मंत्राचा जप करावा. श्रावण महिन्यात सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे. यानंतर तुमच्या घरातील भगवान शंकराला गंगाजल,दूध,दही,मधाने अभिषेक करावा. अभिषेक करतांना ओम नम: शिवाय मंत्राचा जप करावा. त्यानंतर शिवलिंगावर बेलाचे पान, धोतऱ्याचे फुल आणि फळ, अर्पण करावे. नंतर शिव चालीसाचे पठण करावे. आपल्या पती आणि कुटूंबाच्या दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात.
श्रावण महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी बेलाचे पान, फुल आणि पळ अर्पण करावे.
भगवान शंकराला भस्म अर्पण करावे.
हळद, कुंकू, तुळशीचे पान अर्पण करू नये.
नारळ आणि तुटलेला तांदूळ भगवान शंकराच्या पूजेमध्ये कधीही अर्पण करू नये.