राष्ट्रवादी पक्षामध्ये गेल्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा पक्षात हालचालींना वेग आला आहे. अजित पवारांनी बंड केलं त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली आणि दोन गट निर्माण झाले. अशातच पुन्हा एकदा शरद पवार गटातील आणखी एका खासदाराचे आणि एका आमदाराचे समर्थन अजित पवार गटाला असल्याची चर्चा सुरू आहे.
या खासदाराने आणि आमदाराने त्यांचे प्रतिज्ञापत्र अजित पवार यांच्याकडे दिल्याचीही चर्चा सध्या सुरू आहे. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष चर्चेत आला आहे. तर अजित पवार यांना समर्थन देणारा तो खासदार आणि आमदार कोण यावर अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.
अजित पवारांना समर्थन देणारा तो खासदार कोण आहे यांची चर्चा रंगली आहे. शरद पवार यांच्यासोबत आता अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण, फौजिया खान हे खासदार शरद पवारांसोबत आहेत, त्यांच्यापैकीही एक खासदार असू शकतो अशी चर्चा सध्या सुरू आहे.
तर अजित पवार यांच्या बंडानंतर पार पडलेल्या शपथविधीवेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. त्यानंतर ते पुन्हा शरद पवार गटाकडे आले. तसेच राज्यसभेचे खासदार श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण आणि फौजिया खान हे सुरूवातीपासूनच शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आता कोणता खासदार अजित पवारांना समर्थन देणार याबाबतचे तर्क वितर्क लावले जात आहेत.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून शरद पवार गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवार गटाने पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवत शरद पवार गटातील आमदारांना तात्काळ अपात्र करा अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
शरद पवारांनी सेनापती गमावला? एका खासदाराचे आणि आमदाराचे अजित पवारांना समर्थन?
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -