Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगराज्यात दोन पक्ष फोडले आता तिसरा पक्ष फोडण्याची तयारी सुरू; जयंत पाटील...

राज्यात दोन पक्ष फोडले आता तिसरा पक्ष फोडण्याची तयारी सुरू; जयंत पाटील यांचा खळबळजनक दावा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यात दोन पक्ष फोडून झाले आता तिसरा पक्ष फोडण्याची तयारी सुरू असल्याचा खळबळजनक आरोपही जयंत पाटलांनी विधानसभेत केला. अशा उद्योगांमुळे गृहखात्याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोपही जयंत पाटलांनी केला. अंतिम आठवड्याच्या प्रस्तावरून अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये खडाजंगी झाली. विरोधक अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मांडयला विसरले असा आरोप सत्ताधा-यांनी केला. तर सरकार अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मांडत असल्यामुळे विरोधकांनी मांडला नसल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिलं.

राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या चर्चेत जोरदार कलगीतुरा रंगला. फडतूस नव्हे स्वत:ला काडतूस म्हणणा-या गृहमंत्र्यांनी नागपूरच्या वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष द्यावं असा टोला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी फडणवीसांना लगावला. तर मी मुख्यमंत्री झाल्यापासून विरोधकांचं नागपूरवर विशेष प्रेम असल्याचा प्रतिटोला फडणवीसांनी लगावला.

कोणी काय बोलायचं हे पहिला ठरवा असा टोला जयंत पाटलांनी लगावल्यानंतर त्यावर अजित पवार भडकले. हे धंदे आता बंद करा असा सल्ला त्यांनी जयंत पाटलांना दिला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांची जोरदार खडाजंगी झाल्याचं दिसून आलं. त्यामध्ये एकेकाळी एकत्र असलेले अजित पवार आणि जयंत पाटलांनी एकमेकांचा समाचार घेतल्याने सभागृहाचं वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणी आधी बोलायचं ते ठरवा असा टोला जयंत पाटलांनी लगावल्यानंतर अजित पवार चांगलेच भडकले. आमच्याच अंडरस्टँडिंग असून कोण बोलायचं ते आम्हाला माहिती आहे असं ते म्हणाले. तसेच विरोधकांच्या मुद्द्यावरून सभागृहात एक आणि बाहेर एक भूमिका मांडण्याचा धंदा बंद करा असा सल्लाही त्यांनी दिला

.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -