देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसतोय. कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN.1 च्या आतापर्यंत 21 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी गोवा, केरळ आणि महाराष्ट्रामध्ये नव्या व्हायरसची एन्ट्री पहायला मिळाली आहे. मुख्य म्हणजे या सब व्हेरिएंटचे आतापर्यंत गोव्यामध्ये सर्वाधिक रूग्ण सापडले आहेत. ही संख्या 19 वर असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि केरळ मध्ये या सब व्हेरिएंटचा एक-एक रूग्ण आढळून आला आहे.
JN.1, कोरोनाच्या Omicron प्रकाराचा सब व्हेरिएंट असल्यातं समोर आलंय. या सब व्हेरिएंटने गेल्या काही आठवड्यांमध्ये सर्वात वेगाने पसरणाऱ्या व्हायरसपैकी एक बनला आहे. देशभरात वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये, NITI आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के पॉल यांनी बुधवारी सांगितलं की, घाबरण्याची गरज नाहीये. भारतातील शास्त्रज्ञ नवीन प्रकारावर बारीक लक्ष ठेवून आहेत. यावेळी चाचणी वाढवणं आणि त्यांची पाळत ठेवणारी यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला जातोय. देशभरात कोविडची प्रकरणं वाढत असल्याने केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्यास सांगितलंय.