Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगदेशभरात ‘या’ विषयातलं मास्टर डिग्रीचं शिक्षण कायमचं बंद, UGC चा मोठा निर्णय

देशभरात ‘या’ विषयातलं मास्टर डिग्रीचं शिक्षण कायमचं बंद, UGC चा मोठा निर्णय

 

 

महाविद्यालयीन एम.फील डिग्री कायमची बंद होणार आहे. यूजीसीने याबाबतचा खूप मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील सर्व महाविद्यालयांना एम.फील डिग्रीचं अ‍ॅडमिशन न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मास्टर ऑफ फिलॉसॉफी ही डिग्री आता कायमची बंद होणार आहे. यूजीसीचे सेक्रेटरी मनीष जोशी यांनी महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांनादेखील या कोर्ससाठी अ‍ॅडमिशन न घेण्याचं आवाहन केलं आहे. यूजीसीकडून याबाबतचा आदेश आजच पारित करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढच्या शैक्षणिक वर्षापासून एम.फील डिग्रीसाठी अ‍ॅडमिशन अधिकृतपणे बंद होणार आहे.यूजीसीने याबाबत नोटीस जारी केली आहे. एम. फील मान्यताप्राप्त डिग्री नाही, असं युसीजीने स्पष्ट केलं आहे. एम.फील म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी डिग्री ही दोन वर्षांची पोस्टग्रॅज्युएट अॅकेडमिक रिसर्च प्रोग्राम होतं, जे पीएचडीसाठी प्रोव्हिजन इनरोलमेंटसारखं काम करतं. पण आता युजीसीने डिग्रीची मान्यता रद्द केल्याने आता विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी अॅडमिशन घेता येणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -