Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगकुरळप आश्रमशाळेत 8 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; संस्थापकासह दोघांना एकाच गुन्ह्यात 4...

कुरळप आश्रमशाळेत 8 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; संस्थापकासह दोघांना एकाच गुन्ह्यात 4 वेळा जन्मठेप

 

 

पवार हा १९९६ पासून आश्रमशाळा चालवत होता. या शाळेच्या वसतिगृहात शिकणाऱ्या मुलींना स्वयंपाकीण असलेल्या मनीषा कांबळेशी संगनमत करून तो राहत असलेल्या खोलीत बोलावून अत्याचार करत होताआठ अल्पवयीन मुलींवर (Minor Girls) लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद आबा पवार (वय ६६) व त्याला मदत करणारी वसतिगृहातील स्वयंपाकीण मनीषा कांबळे (वय ४३) यांना येथील जिल्हा न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी एकाच गुन्ह्यांत चार वेळा जन्मठेपेची व विनयभंगाच्या गुन्ह्यात स्वतंत्र शिक्षा सुनावली.

 

एकाच गुन्ह्यात चार वेळा जन्मठेप देण्याची सांगली (Sangli) जिल्ह्यातील ही पहिलीच आणि ऐतिहासिक घटना आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये कुरळप पोलिस ठाण्यांतर्गत (Kurlap Police) अरविंद पवार व मनीषा शशिकांत कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.खटल्याची पार्श्‍वभूमी अशी, अरविंद आबा पवार (रा. मांगले, ता. शिराळा) हा १९९६ पासून आश्रमशाळा चालवत होता. या शाळेच्या वसतिगृहात शिकणाऱ्या मुलींना स्वयंपाकीण असलेल्या मनीषा शशिकांत कांबळे (रा. चिकुर्डे, ता. वाळवा) हिच्याशी संगनमत करून तो राहत असलेल्या खोलीत बोलावून अत्याचार करत होता. पवार या मुलींना शाळेतून काढून टाकण्याची, तसेच दाखल्यावर लाल शेरा मारण्याची भीती घालत होता.

 

मनीषा कांबळे हिच्याशी संगनमत करून मुलींना खाऊचे आमिष दाखवून वारंवार मुलींना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केल्याचेही तक्रारीत म्हटले होते. या अत्याचाराबाबत सर्व मुलींनी मिळून तत्कालीन महिला पोलिस उपनिरीक्षक पल्लवी सुभाष चव्हाण यांना २५ सप्टेंबर २०१८ या दिवशी निनावी पत्र लिहिले. आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद पवार व त्याच्याकडे कामाला असणारी मनीषा कांबळे हे दोघे मिळून त्यांच्यावर अत्याचार करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, असे पत्रात म्हटले होते.

 

अत्यंत दहशतीखाली लिहिलेल्या मुलींच्या या पत्राने पोलिसांचे धाबे दणाणले. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे व पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ २६ सप्टेंबरला आश्रमशाळेतील मुलींकडे चौकशी केली. त्यानुसार त्यांच्यावर अत्याचार होत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांच्यापुढे कामकाज चालले.

पवार व कांबळे यांच्याविरुद्ध ठेवलेले दोषारोप सरकार पक्षाने सिद्ध केले. त्यानुसार आज शिक्षा सुनावली. एकूण २० जणांची साक्ष नोंदविली. चार मुलींचे जबाब घेऊन त्यांच्यावर ३७६ प्रमाणे अत्याचार झाल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार प्रत्येक मुलींवर झालेल्या अत्याचारासाठी स्वतंत्र अशी चार वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली. वैद्यकीय अधिकारी नितीन चिवटे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. जिल्हा सरकारी वकील म्हणून शुभांगी पाटील व सहाय्यक सरकारी वकील रणजित पाटील यांनी काम पाहिले.

 

जिल्ह्यातील पहिलीच शिक्षा..!

 

चार पीडित मुलींवर झालेले स्वतंत्र अत्याचार सिद्ध झाल्याने एकाच प्रकारच्या गुन्ह्यात चार वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची सांगली जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. दंडाच्या रकमेतील प्रत्येकी पन्नास हजार रुपये अत्याचारित मुलींना, तर विनयभंग झालेल्या दोन मुलींना प्रत्येकी पाच हजार रुपये भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -