Tuesday, February 27, 2024
Homeराजकीय घडामोडीसगेसोयरेवर आक्षेप असेल, पण… ओबीसी नेत्याची पहिली प्रतिक्रिया काय? मुंबईत ओबीसी धडकणार...

सगेसोयरेवर आक्षेप असेल, पण… ओबीसी नेत्याची पहिली प्रतिक्रिया काय? मुंबईत ओबीसी धडकणार की नाही? काय दिलं उत्तर?

मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाच्या सग्यासोयऱ्यांना आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीला सरकारने मान्य केले आहे. सध्या नवी मुंबईच्या वाशी येथे मनोज जरांगे यांची विजयी सभा सुरू आहे, मात्र दुसरीकडे ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रीयादेखील येण्याला सुरूवात झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागल्यास मोठ्या संख्येने ओबीसी समाज मुंबईला येईल असा इशारा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिला होता. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मराठा आरक्षणावर आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे.ओबीसी नेते बबनराव तायवाडे काय म्हणाले?

ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मराठा आरक्षणासंबंधी निघालेल्या नव्या अध्यादेशावर आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. सगे सोयरे यात काय शब्द जीआरमध्ये आहे ते वाचल्याशिवाय त्यावर बोलणार नाही असे बबनराव तायवाडे म्हणाले. यात कुठला शब्द प्रयोग आहे हे जीआर वाचल्याशिवाय कळणार नाही असंही ते म्हणाले.

नौकर भरती करताना आरक्षण दिल जाईल असं सांगितलं जातं नाही असंही ते म्हणाले.आंदोलन उभं राहतं तेव्हा संवाद उभा राहायला हवा, वेळ पडल्यास एक पाऊल मागे यावं लागतं असे तायवाडे म्हणाले. सगे सोयरे यावर आक्षेप असेल पण यावर वाचल्याशिवाय काहीच बोलणार नाही तसेच 99.5 टक्के नोंदी नविन नाही असंही बबनराव तायवाडे म्हणाले. याशिवाय नविन नोंदी किती हे सरकारने सांगावे असंही ते म्हणाले. माझा माहिती नुसार 20 हजार लोकांना नवीन प्रमाणपत्र दिले. ओबीसीच्या बैठकीत शब्द दिला तो पाळत असल्यानं आमचा याला विरोध नाही. आजोबा वडील यांच्या पुरावा असल्यास त्याला विरोध नाही. त्यामुळे ओबीसीला धक्का लागत नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही म्हणून आता आम्हाला मुंबई जाण्याची गरज नाही असं मत बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -