Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीवस्त्रोद्योगाला उर्जितावस्था देण्यासाठीचा विविध समितींचा अहवाल आमदार आवाडे यांनी केला सुपूर्द :...

वस्त्रोद्योगाला उर्जितावस्था देण्यासाठीचा विविध समितींचा अहवाल आमदार आवाडे यांनी केला सुपूर्द : वाचा सविस्तर : Textile Buisness

वस्त्रोद्योगाला उर्जितावस्था देण्यासाठीचा विविध समितींचा अहवाल आमदार आवाडे यांनी केला सुपूर्द : वाचा सविस्तर

इचलकरंजी /ताजी बातमी ऑनलाइन टीम

अडचणीतील वस्रोद्योगाला उर्जितावस्था देण्यासाठी राज्य शासनाने नामदार दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या अभ्यास समितीने राज्यभरातील संघटनाकडून माहिती घेऊन अहवाल तयार केला आहे. हा अहवाल समिती सदस्य आमदार प्रकाश आवाडे यांच्यामार्फत वस्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे.     Manchester Buisness

राज्यातील यंत्रमागधारकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात आली. नामदार दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या आजवर तीन बैठका झाल्या. Textile Buisness

त्यामध्ये राज्यातील विविध भागातील यंत्रमागधारक संघटनाकडून घेतलेल्या माहितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या माहितीच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनांचा एक सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे.

हा अहवाल समितीचे सदस्य आमदार प्रकाश आवाडे यांच्यामार्फत वस्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन आवश्यक उपाययोजनाची अंमलबजावणी करण्यात येईल.

यावेळी आमदार रईस शेख, वस्रोद्योग सचिव वीरेंद्र सिंग, श्रीकृष्ण पवार, गोरक्ष गाडिलकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -