ताजी बातमी /ऑनलाईन टीम
मतदानाला आता काही तास बाकी राहिले असून सर्वच यंत्रणा आता गतिमान झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 255 केंद्रांवर मतदान होणार असून यासाठी बाराशे 75 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आज सोमवारी दिनांक 6 रोजी राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथून मतदान यंत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महसूल मोसमी चौगुले यांनी पत्रकार बैठकीत दिली.