ताजी बातमी/ ऑनलाइन टीम
हातकणंगले लोकसभेसाठी इचलकरंजीत मंगळवार दिनांक सात रोजी मतदानाच्या वेळी एकूण 72 टक्के मतदान झाले. दुपारी तीन पर्यंत ही टक्केवारी 47% च्या पर्यंत होती.
दुपारच्या वेळी रखरखत्या उन्हात काही मतदान केंद्रांवर मोठमोठे रांगा दिसून येत होत्या. तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपात गर्दी दिसत होती. यावेळी दिवसभरात मतदानाचा टक्केवारी वाढण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबरच अधिकारांचाही मोठा प्रयत्न सुरू होता.
दरम्यान दुपारी साधारणपणे 4.30 ते 5.45 या कालावधीत एक फोन अनेक मतदारांना आल्याची चर्चा सर्वत्र होती. हा फोन कोणाकडून आला हे न सांगताच फोनवरून त्या बाजूने एका महिलेचा आवाज येत होता.
यावेळी तिकडून विचारण्यात येत होते तुम्ही आता तुमच्या मतदारसंघातील कोणत्या उमेदवाराला मतदान केलात किंवा कोणत्या चिन्हाला मतदान केला. यानंतर काही प्रमुख उमेदवारांची नावे सांगत ज्याला तुम्ही मतदान केलात त्याला एक दोन तीन असे क्रमांक दाबून उत्तर द्या असे सांगण्यात येत होते.
दरम्यान निवडणुकीपूर्वी अनेकांनी सर्वे केला विविध सर्वेंचे पोल जाहीरही करण्यात आले. मतदाना दिवशीच थेट तुम्ही कोणाला मतदान केला. अशी चौकशी कुठल्या संस्थेच्या सर्वेकडून केली जात होती याबाबत मतदारात मोठी चर्चा होती. मुळात मतदान प्रक्रिया ही गुप्त पद्धतीची असताना कुणाला मतदान केला हे थेट कसे विचारण्यात येते? ही नागरिकात संताप जनक चर्चा सुरू होती.