Friday, February 7, 2025
Homeइचलकरंजीसाहेब दंड लई हाय : तो थांबवा : रिक्षा बंद अनेकांची पायपीट

साहेब दंड लई हाय : तो थांबवा : रिक्षा बंद अनेकांची पायपीट

तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी आकारलेले विलंब शुल्क रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या रिक्षा बंद आंदोलनात इचलकरंजीतील सर्वच रिक्षा संघटनानी सहभागी घेत कडकडीत बंद पाळला. दिवसभर रिक्षा बंदमुळे प्रवाशी व नागरिकांना मात्र पायपीट करावी लागली.

केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार तंदुरुस्ती प्रमाणपत्र घेण्यास विलंब केल्यास दररोज ५० रुपये दंड लागू केला आहे. या मूळ परिपत्रकाला स्थगिती मिळावी, तंदुरुस्ती प्रमाणपत्र न घेतलेल्या रिक्षाचालकांना मुदत मिळावी आणि मुदतीनंतर प्रमाणपत्र विलंबासाठी योग्य रक्कम आकारावी, दररोज ५० रुपये असलेला दंड रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी रिक्षाचालक संघटनांच्या वतीने आंदोलने सुरु आहेत. त्याच अनुषंगाने कोल्हापूर रिक्षा, टॅक्सी वाहनधारक समितीतर्फे मंगळवारी रिक्षा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्ये इचलकरंजी शहरातील महाराष्ट्र रिक्षा चालक संघटना, इंदिरा ऑटो यूनियन, विद्यार्थी वाहतूक संघटना, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज रिव्हर्स, महात्मा फुले रिक्षा स्टॉप, शिवसेना रिक्षा चालक संघटना आदी सर्वच संघटना सहभागी झाल्या होत्या. दिवसभर रिक्षा नसल्याने त्यांना पायपीट करावी लागली. या आंदोलनास शहरातील विविध राजकीय व सामाजिक तसेच वाहतूक संघटनांनी पाठींबा दर्शविला.

यावेळी नंदा साळुंखे, रामचंद्र जाधव, जीवन कोळी, लियाकत गोलंदाज, मन्सुर सावनुरकर, कय्युम जमादार, हरी पाटील, दौलत भोरे, राजेश आवळे, सुनिल यादव, राजाराम माळगे, अल्ताफ शेख, अनिल बमण्णावर, शशी धुर्वे, करीम सनदी, शाहीर जावळे, बाळू खाडे, अशोक शिंदे, खलील हिप्परगी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -