Saturday, February 8, 2025
Homeमहाराष्ट्रआषाढीसाठी लालपरी सज्ज ! ST महामंडळाकडून भाविकांसाठी विशेष सुविधा

आषाढीसाठी लालपरी सज्ज ! ST महामंडळाकडून भाविकांसाठी विशेष सुविधा

आषाढी एकादशी येत्या 17 जुलै रोजी आहे. या आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रच्या वेगवेगळ्या ठिकाणातून हजारो वारकरी ,भाविक हे पंढरपुराकडे जात असतात. यासाठीच भाविकांची सोय व्हावी याकरिता एसटी महामंडळाकडून ज्यादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आषाढी वारी करिता मुंबईतून दोनशे ज्यादा बसेस सोडण्यात येत असल्याचं महामंडळाकडून ( Ashadhi Ekadashi 2024) सांगण्यात आलं आहे.

 

मिळणार सवलत

 

या प्रवासात 75 वर्षांवरील जेष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50% तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

5000 विशेष बस सोडण्याचे नियोजन

एसटी महामंडळाकडून पंढरपूर ला 5000 विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून ( Ashadhi Ekadashi 2024) एसटी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असं आवाहन देखील एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

 

 

वाढीव गर्दी करीता 700 बसची व्यवस्था

 

भाविकांच्या वाढीव गर्दी करीता 700 बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परतीची वाहतूक एकादशीच्या दिवसापासूनच सुरू होत आहे त्याकरिता दशमी पर्यंत जास्तीत जास्त गाड्या प्रत्येक विभागाकडून उपलब्ध राहतील यासाठीच नियोजन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

 

फुकट्यांना बसणार लगाम

गेल्या वर्षी आषाढी यात्रेनिमित्त 4245 विशेष बस सोडल्या होत्या. यात्रेद्वारे यात्रा काळामध्ये 18 लाख 30 हजार 934 भाविक प्रवाशांची सुखरूप ने आणि एसटीने केली होती. फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला ( Ashadhi Ekadashi 2024) जाणाऱ्या विविध मार्गांवर बारा ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचा नियोजन केले आहे. शिवाय फुकट प्रवाशांना अटकाव घालण्यासाठी एसटीचे 200 सुरक्षा कर्मचारी अधिकारी यात्रा काळात 24 तास नजर ठेवतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -