ताजी बातमी/ ऑनलाईन टीम
इचलकरंजीतील शहापूर परिसरात एका अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सुशांत कांबळे राहणार आसरा नगर इचलकरंजी असे त्या मुलाचे नाव आहे.
ही घटना शहापूर येथील गाव चावडी जवळ घडल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस तेथे दाखल झाले आणि पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला.
हा खून कशासाठी करण्यात आला हे अद्याप समजलेले नाही पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.