Saturday, November 23, 2024
Homeब्रेकिंगया 10 उत्पन्नावर नाही लागत आयकर, रिटर्न भरण्यापूर्वी घ्या जाणून

या 10 उत्पन्नावर नाही लागत आयकर, रिटर्न भरण्यापूर्वी घ्या जाणून

जुन्या कर प्रणालीअंतर्गत 60 वर्षांहून कमी वयाच्या व्यक्तींना 2.5 लाख रुपयांहून अधिक कर पात्र रक्कमेवर कराचा भरणा करावा लागतो. तर 60 ते 80 वर्षासाठी ही मर्यादा 3 लाख तर 80 वर्षांवरील नागरिकांसाठी ही मर्यादा एका आर्थिक वर्षासाठी 5 लाख रुपये आहे.

 

यंदा आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. जर तुम्ही आयकर भरण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला कोणत्या उत्पन्नावर कर लागतो आणि कोणत्या कमाईवर आयकर भरावा लागत नाही, याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या कराची बचत होईल. या 10 कमाईवर तुम्हाला आयकर भरण्याची गरज नाही. त्यावर कर भरावा लागत नाही.

 

कृषी उत्पन्न : भारतात कृषी उत्पन्नावर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा आयकर भरावा लागत नाही. ही सवलत केवळ पीक विक्रीच नाही तर शेतीवरील इमारतीचे भाडे आणि जमीन खरेदी-विक्री होणाऱ्या लाभावर सुद्धा आयकर द्यावा लागत नाही.

 

NRI खात्यावरील व्याज : एनआरआय खात्यावर एनआरआय जमा होणाऱ्या रक्कमेवरील व्याज कर मुक्त आहे. एनआरआय त्याच्या मुळ ठिकाणच्या खात्यात रक्कम हस्तांतरीत करु शकतो.

 

ग्रॅज्युएटी : खासगी क्षेत्रात, सेवानिवृत्तीवर 20 लाख रुपयांपर्यंतच्या ग्रॅज्युएटी रक्कमेवर कर्मचाऱ्यांना आयकर भरण्याची गरज नसते.

 

कॅपिटल गेन : काही कॅपिटल गेनवर पण कराचा भरणा करण्याची गरज नसते. शहरातील कृषी जागेच्या मोबदल्यात संबंधित व्यक्तीला कराचा भरणा करावा लागत नाही.

 

पार्टनरशिप फर्मचा लाभ : आयकर अधिनियम अंतर्गत सहभागीदारी संस्थेच्या कमाईवर कर लावल्या जातो. या फर्मसाठी काम करणाऱ्या भागीदारांना त्यांच्या लाभावर कर द्यावा लागत नाही. कारण त्यांना संस्थेच्या कर भरणानंतर लाभाचा हिस्सा मिळतो.

 

शिष्यवृत्ती : शिक्षणासाठी सरकारी आणि खासगी संस्थांकडून शिष्यवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना आयकरावर सवलत देण्यात येते.

 

भविष्य निर्वाह निधी : भारतात कंपनी अधिनियम, 1956 अंतर्गत नोंदणीकृत कंपन्यांना अनिवार्य बचत योजना, भविष्य निर्वाह निधी वयानुसार वाढते आणि सेवानिवृत्तीपर्यंत ही रक्कम कर मुक्त असते.

 

कर-मुक्त पेन्शन : UNO सारख्या काही संघटनांचे पेन्शन कर मुक्त आहे. कर्मचाऱ्यांवर आधारीत कुटुंबांना पेन्शनचा लाभ सुद्धा कर मुक्त आहे.

 

स्वेच्छानिवृत्ती : सेवानिवृत्तीपूर्वी स्वेच्छानिवृत्तीवर प्राप्त 5 लाख रुपयांपर्यतची रक्कम करमुक्त आहे. नातेवाईकांकडून लग्न वा इतर कार्यक्रमात प्राप्त भेटवस्तू करमुक्त आहेत.

 

भत्ते आणि मोबदला : भारतात कोणत्याही व्यक्तीसाठी काही भत्ते करमुक्त आहेत. परदेशात कार्यरत भारतीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे भत्ते करमुक्त आहेत. सेवानिवृत्तीवर सार्वजनिक उपक्रमातील कंपन्यांकडून मिळणारा मोबदला पण कर मुक्त आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -