Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीपंचगंगा पातळीत वाढ

पंचगंगा पातळीत वाढ

धरण पाणलोट क्षेत्रासह शहर व परिसरात दमदार हजेरी लावलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत गतीने वाढ होत चालली आहे. येथील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत चालले असून यंदा प्रथमच पंचगंगा पात्रा बाहेर पडली आहे. जुन्या पुलाला पाणी घासू लागल्याने या पुलावरून होणारी वाहतूक सोमवारी सकाळपासून बंद करण्यात आली आहे. महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. मागील 24 तासात पाणी पातळीत तीन फुटांची वाढ झाली असून पाणी पातळी 57.1 फुटावर पोहचली आहे..

मागील काही दिवसांपासून शहर परिसरासह कोकण आणि धरण पाणलोट क्षेत्रात वरून राजाने दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे धरणातून पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे या कारणात च सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत चालले आहे येथील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये दोन दिवसापासून वाढ होत चालले आहे शनिवार ते रविवारी सायंकाळपर्यंत पाणी पातळीत सव्वा दोन फुटांची वाढ झाली होती संत धार कायम राहिल्यास सोमवारी जुन्या पुलावर पाणी येण्याची शक्यता वर्तवली जात होती.

पाणी जुन्या पुलाला घासून वाहू लागल्याने सोमवारी सकाळी खबरदारी म्हणून महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे केवळ मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने वाहतुकीची कोंडी होत होती महापूराची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज केले आहे आपत्कालीन विभाग प्रमुख संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नदीकाठावर कर्मचाऱ्यांसह अग्निशामक दल यांत्रिक बोट सज्ज ठेवले आहे .

रविवारी सायंकाळी पाणीपातळी 54.3 फुटावर होती त्यामध्ये तीन फुटांची वाढ होऊन सोमवारी सायंकाळी 57.1 ft वर आली होती पंचगंगा नदीची इशारा पातळी 68 कोटावर धोका पातळी 71 फुटावर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -