Friday, February 7, 2025
Homeतंत्रज्ञान‘या’ आहेत 5 बेस्ट स्वस्त CNG कार, कमी खर्चात जास्त पळणार

‘या’ आहेत 5 बेस्ट स्वस्त CNG कार, कमी खर्चात जास्त पळणार

चांगला मायलेज आणि कमी खर्चात कार चालवणं कोणाला आवडणार नाही? जर तुम्ही, चांगला मायलेज आणि कमी रनिंग कॉस्टसाठी सीएनजी कार विकत घेण्याचा प्लान बनवताय, तर या 5 कार्सवर नजर मारु शकता.

 

मारुती सुजुकी ऑल्टो स्वस्त CNG कार आहे. सीएनजी वर्जनची एक्स-शोरूम किंमत 5.73 लाखापासून सुरु होते. ऑल्टो K10 सीएनजीवर 33.85 किमी प्रति किलोग्रॅम मायलेज मिळू शकतो असा मारुती सुजुकीचा दावा आहे. (Maruti Suzuki)

 

मारुती सुजुकीची एस-प्रेसो स्वस्त सीएनजी कार आहे. सीएनजी हॅचबॅक कार 32.73 किमी प्रति किलोग्राम मायलेज देऊ शकते. सीएनजी मॉडलची एक्स-शोरूम किंमत 5.91 लाख रुपयापासून सुरु होते. मारुतीच्या सीएनजी कार्समध्ये S-CNG टेक्नोलॉजी मिळते. (Maruti Suzuki)

 

वॅगनआरचा भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार्समध्ये समावेश होतो. वॅगनआरच CNG वर्जन सुद्धा आहे. वॅगनआर सीएनजी एक्स-शोरूम प्राइस 6.44 लाख रुपयापासून सुरु होते. ही सीएनजी कार 34.05 किमी प्रति किलोग्राम मायलेज देऊ शकते. (Maruti Suzuki)

 

हुंडई ग्रँड i10 Nios सीएनजी ऑप्शनसह विकत घेऊ शकता. i10 Nios च्या सीएनजी वर्जनची एक्स-शोरूम किंमत 7.68 लाख रुपये आहे. ही सीएनजी कार जवळपास 25.61 किमी प्रति किलोग्राम मायलेज देऊ शकते. (Hyundai)

 

टाटा मोटर्सच्या सीएनजी कारमध्ये iCNG टेक्नोलॉजी मिळते. तुम्ही टाटा टियागो सीएनजी वर्जन 8.29 लाख रुपये एक्स-शोरूम किंमतीत खरेदी करु शकता. ही CNG कार तुम्हाला जवळपास 26.47 किमी प्रति किलोग्राम मायलेज देऊ शकते. (Tata Motors)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -