इचलकरंजीतील येथील बसस्थानकावर एसटीतून उतरताना महिलेच्या गळ्यात अडकवलेल्या पिशवीतून सोन्याच्या गंठणचा बॉक्स चोरीला गेल्याची घटना घडली.सुमारे ६.३ तोळे सोन्याच्या दागिन्यांचा १ लाख ९१ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.याबाबतची फिर्याद स्नेहा प्रमोद पोळ (वय ३४ रा. डेक्कन मिल जवळ, इचलकरंजी) यांनी दिली.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पोळ या मिरज येथे माहेरी गेल्या होत्या. बुधवारी(ता. 21) मिरज येथून दुपारी इचलकरंजीला बसमधून निघाल्या. यावेळी त्यांच्या गळ्यात एक पिशवी अडकवलेली व त्यामध्ये सोन्याचे गंठण असणारा बॉक्स होता.
दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास येथील बसस्थानकावर उतरल्यानंतर गळ्यात अडकवलेल्या पिशवीतून सोन्याच्या गंठण असलेला बॉक्स चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. बसस्थानकावर महिलेचे सोन्याचे गंठण चोरीला गेल्याची गेल्या चार दिवसातील ही दुसरी घटना आहे.