Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रमतदानासाठी 20 नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर; सरकारी परिपत्रक जारी

मतदानासाठी 20 नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर; सरकारी परिपत्रक जारी

राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून अगदी दोन-चार दिवसातच सर्व मतदारांचे भविष्य मतदान पेटीत बांधले जाणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका 20 नोव्हेंबरला होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत.

 

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगही वेगाने कामाला लागला असून भरारी पथक, स्थिर पथक, पोलीस यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणाच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढाव यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगानेही यापूर्वी विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात येत असल्याचे सांगितले होते. राज्यातील कामगार आयुक्तांना तसे निर्देशही दिले होते आता राज्य सरकारकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलं असून आता 20 नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 

काय आहे परिपत्रकात?

 

मंत्रालयातील सर्व विभागांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदरची अधिसूचना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणावी. तसेच केंद्र शासनाधीन शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्याचे सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असेही परिपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभाग यांनी सदर अधिसूचना काढून प्रसिद्ध करावी, असे आदेशही महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी दिले आहेत. शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांच्या सहीने हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

 

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान दिनी 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर झाली आहे. त्यानुसार, क्रमांक सार्वसु-१०२४/१२६ (२९) लेखअधिनियम, १८८९ (१८८९चा २६) च्या कलम २५ नुसार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३१/१/६८ जेयुडीएल तीन दिनांक ८ मे १९६८ अन्यये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने बुधवार दिनांक २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सर्व विधानसभा मतदारसंघानिक सुट्टी करीत आहे, असे परिपत्रकच राज्य शासनाच्यावतीने करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -