Friday, June 21, 2024
Homeअध्यात्मकरा फक्त हा उपाय : घरातील सर्व अडचणी एका महिन्याच्या आत  दूर...

करा फक्त हा उपाय : घरातील सर्व अडचणी एका महिन्याच्या आत  दूर होतील : श्री स्वामी समर्थमित्रांनो तुम्हाला तुमच्या घरातल्या  सर्व अडचणी एका महिन्यात तुम्हाला दूर करायच्या असतील, आपल्या घरातल्या सगळ्या अडचणींपासून सुटका तुम्हाला मिळवायची असेल तर महिनाभर हा एक उपाय अवश्य करा. पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हा उपाय केला तर  तुमच्यावर, तुमच्या परिवारावर आलेल्या सगळ्या अडचणी एका महिन्याचा आत दूर होतील. 

मित्रांनो हा उपाय महिलांनी केला तरी चालतो पुरुषांनी केला तरी चालतो पण महिनाभर हा उपाय करायचा असतो. समजा तुम्ही पाच तारखेपासून किंवा दहा तारखेपासून हा उपाय सुरू केला तर पुढच्या महिन्याच्या पाच आणि दहा तारखेपर्यंत हा उपाय तुम्हाला सातत्याने करायचा असतो म्हणजे हा उपाय तुम्ही आठवड्यात कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता. पण त्या दिवसापासून 30 दिवसांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे.

मित्रांनो हा उपाय कसा, कुठे, केव्हा करायचा ? तर हा उपाय तुम्हाला रोज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी जेव्हा साडे सहा – सातच्या दरम्यान आपण देव पूजा करतो, त्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि  देव घरातच हा उपाय करायचा आहे.

आपल्या घरात छोटीसे देवघर असतेच तर त्याच्या समोरच हा उपाय आपल्याला करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला 1-2 कापराच्या वड्या आणि एक छोटीशी वाटी लागेल. आधी तर त्या वाटीमध्ये एक चिमूटभर तांदूळ घ्यायचे त्या वाटीत टाकायचे. त्यावर एक किंवा दोन कापराच्या वड्या ठेवायच्या  आहेत आणि ते कापूर तुम्हाला जाळायचे आहे.

तो कापूर जाळून नंतर तुम्ही तिथून उठून जायचं. तो कापूर तिथे जळू द्यायचा आणि आपल्या घराच्या सगळ्या खिडकी दरवाजे थोड्यावेळासाठी तो कापूर जळतोय तोपर्यंत बंद करायच्या आहेत किंवा तुम्ही आधीच बंद करू शकता आणि त्यानंतर कापूर जाळू शकता.

कापुराचा जो  धूर घरामध्ये पसरेल त्याने तुमच्या सगळ्या अडचणी नष्ट होतील. नकारात्मकता घरातून नष्ट होईल, जी पण पीडा आहे, दोष आहे ते नष्ट होतील आणि घरात सकारात्मकता वावरेल. सुख-समृद्धी कापुराचा धूर संध्याकाळच्या वेळेस घरात प्रसन्नता, शांती, समाधान, समृद्धी आणतो.

मित्रांनो तुम्ही घराचे सगळे दरवाजे, खिडक्या पाच मिनिटांसाठी बंद करून हा कापूर जाळावा आणि कापूर जळल्यानंतर लगेच खिडक्या दरवाजे उघडायचे असतात. तर मित्रांनो हा उपाय नक्की करा तुम्हाला नक्की लाभ होईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या शास्त्रांचे आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धे शी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या घरगुती समस्या, नोकरी विषयक अडचणी, व्यवसायातील अडचणी, घरातील आजारपण, वास्तुशास्त्राचे दोष, संतान प्राप्ति, लक्ष्मी प्राप्ती, दुष्ट नजरेपासून बचाव इत्यादी प्रकारच्या वेगवेगळ्या उपायांसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -