सांगली-कोल्हापूर महामार्गावरील चिपरी, धर्मनगर (ता. शिरोळ) येथे झालेल्या अपघातात स्वरा अजय पोवार (वय दीड वषर्र्, रा. रामानंदनगर, कोल्हापूर) या बालिकेचा जागीच मृत्यू झाला.
मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास दुर्घटना घडली. अपघातात वडील अजय राम पोवार (32) व आई शीतल अजय पोवार (28) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अजय व शीतल पोवार हे पती-पत्नी दुचाकीवरून कोल्हापूरहून माधवनगर (जि. सांगली) येथे मंगळवारी रात्री जात होते. धर्मनगर येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये स्वरा या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. जखमी पती-पत्नीवर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. स्वराच्या अपघाती मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.